नाजूक सुरकुत्या
नाजूक सुरकुत्या
बालपणीचा तो नटखट मासूम चेहरा
तारुण्य पणाचा रुबाब वेगळा आहे
उतरत्या वयात शरीर हे थकते फार
सुरकुत्या अंगावर सर्वत्र पडत आहे
तारुण्यात कोमल सुंदर रूप दिसते
हृदय आकर्षणात होण्याचे वय आहे
म्हातारपणी हातांनी काम नाही होत
लडखडत चालण्याचे घाव काळ आहे
रंग रंगांत भिजलेलं तारुण्य गोड वाटे
उंच भरारी घेण्याच मोठ सामर्थ्य आहे
सक्षमता हळूहळू शरीराची ठार झाली
हाल लाचारी वेदनांचा डोंगर देत आहे
गात गाणी तारुण्याची मोज मजा सारी
लाखो स्वप्ने खरं करण्याचे हे वय आहे
थरथर कापते हात लडखडते ते बोल
डोळ्यांची धुंदली दृष्टी काळोख आहे
हृदय हृदयाशी अलगद जुळे तारुण्यात
अनेक नात्यांना तारुण्य जन्म देत आहे
वृद्धावस्थेत साथ सुटते जीवनसाथीची
साथ सुटत जाते या शरीराचा श्राप आहे
