नाही कसा म्हणू मी ...
नाही कसा म्हणू मी ...
दिशाहीन झाल्या वाटा जरी
अखंड , अविरत चालतो आहे
तुडवीत नागमोडी पायवाट
विसरलो नाही वहिवाट जुनी
अंधारले जग सारे माझ्यालेखी
जरी दिव्यांचा झगमगाट आहे
नाही तरी कसा म्हणू मी ...
जगन्याची आस तुझेच भास आहे
तो सूर्य ,चंद्र तारका नव्हत्याच कधी
आपुल्या का ? समजून घेत आहे
दोष तरी का कुणास द्यावा ?
सारे उपद्व्याप आपल्याच माथी
नाही कसा म्हणू मी ...
होतो जसा मी आजही तसाच आहे
गर्दीतल्या घोळक्यातही एकटा
आपल्यातही परका ,नवखा जरासा
