मुस्लिम नाका कामगार
मुस्लिम नाका कामगार
व्यथा एका नाका कामगाराची,
इमारत बांधकाम, त्रस्त मजुराची,
काम मागतो आज स्टेशनच्या नाक्यावर,
भल्या पहाटे उठून रोजगार देण्याची!!१!!
भारताच्या कानाकोपऱ्यातून,
आले कामाच्या शोधात मजूरदार,
बहुतांश वर्ग दिसतो तळमळीत,
दुःखी, कष्टी, त्रस्त मुस्लिम कामगार!!२!!
सुंदर घरे बांधून देणारा,
खुद्द झोपडपट्टीचा निवासी,
लढतो आहे रोज संघर्षासाठी,
अन्न-वस्त्र-निवारा च्या शोधासी!!३!!
शहराच्या विकासात आहे,
यांचा मोठा सिंहाचा वाटा,
योगदान त्यांचे दिसे सर्वांना,
तरीही दुर्लक्षित कामगारांचा साठा!!४!!
ताकद लावली सारी आज,
बिल कार्यान्वित करण्यासाठी,
जोर लावून दूर राहिला,
नाका कामगारच लाभ घेण्यासाठी!!५!!
आहेत आज अनेक संघटना,
कार्यान्वित कल्याणकारी योजना,
तरी ही कोण घेतो हमी यांची,
पूर्ण करण्यास अडचणींचा सामना!!६!!
सुधारू या मानसिकता मोठ्या वर्गांची,
तथाकथित सभ्य लोकांच्या नजरांची,
सरकार, सामाजिक, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून,
प्रश्न सोडवू या त्रस्त कामगारांची!!७!!
