Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shivani Hanegaonkar

Inspirational

4.2  

Shivani Hanegaonkar

Inspirational

मुलगी

मुलगी

1 min
323


मुलगी असते गं , खरच लाघवी.......

म्हणूनच तर घरोघरी एकतरी जन्मावी.....


चिवचिवाटाने तिच्या , सार घर भरत....

खुळावलेल घर,तिच्या भोवती फिरत.....


तिच असण, मनाला देत प्रसन्नता.....

तिच तर असते घराची खरी संपन्नता.....


तिच घेते आईच्या मनाचा अचूक ठाव.....

कळतात तिला चेहऱ्यावरचे अचूक भाव.....


तिच्या स्पर्शातली जादू म्हणजे....जिभेवरची साखर....

विरघळत बापाच काळीजही कणखर......


असते ती मुळात स्वभावाने चाणाक्ष.....

घरातल्या सगळ्यांवर असत तिच लक्ष.....


आई, आज तोंड का गं तुुुझ उतरलय ?

आई , दादाच हल्ली काही बिनसलय......


आई, आबांच्या उशीच कव्हर फाटलय.....

आई, आजीच औषध कालच संंपलय.....


आई, बाबांचा दिवसेंदिवस वाढतोय घेर.....

आई, कामवाली नीट काढत नाही केर......


होवू दे मोठी, ती आणि स्वप्न तिची...

सोडवू दे तिला तिची, पडलेली सगळी कोडी.....


पंंखांतील बळावर , घेेेेईल ती क्षितीज भरारी.....

तु मात्र कच न खाता, कर मनाची तयारी.....


कितीही दूूूर गेेली तरी तुुुुटणार नाही नाळ.....

वियोगाच्या दुःखावर फुंकर घालतील काळ.....


कोण म्हणत मुुुुलगी चालवत नाही आपला वंश.....

तिच्यातही असतोच ना आपला एक सुंदर अविभाज्य अंश.....?


Rate this content
Log in