मुलगी
मुलगी
हो नको आहे मला मूलगी.
असेल मुलीचा गर्भ तर,
डॉक्टर जन्मा आधीच संपवा तिला.
चुकुन आलीसच जर मूलगी जन्माला,
सांगा कशी तिला सांभाळु?
तिला बाहेर खेळायला कशी पाठवू?
शाळेत कशी तिला सोडू?
चहु बाजूला लपुन बसलेत राक्षस सारे,
का तिचे लचके देवू त्या नराधमाना तोड़ू?
नाही सुरक्षित इथे बालिका,
नाही सुरक्षित साठीची वृद्धा.
विनयभंग आणि बलात्कार,
रोजच यांच्या बातम्या,मन होइ द्विधा.
मुलीला जन्म देवू की नको,
सतवतो हाच प्रश्न प्रत्येक मातेला.
मूलगी कशी ही असु दे,
कसे ही कपड़े घालु दे.
त्याची वासना येतेच उफाळुन,
कशी ठेवू मग लेकीला सांभाळुन?
कीती ही कठोर शासन असु दे.
भीती नाही उरली त्याला कायद्याची.
म्हणूनच घाबरते हो , जन्म मुलीला द्यायला.
म्हणुनच आता वेळ आली आहे,
उच्च शिक्षण मुलीला देण्याची,
या वाईट विकृति वर मात करण्याची.
नका समजू तिला एक पणती,
ती तर लखलखनारा प्रकाश आहे .
घर उजळून टाकनारा दीप आहे.
जवळ तिच्या येशील तर,
जळून राख तुझीच होणार आहे.
इतके तिला आम्ही, दैदीप्यमान बनवनार आहे.
