STORYMIRROR

Rutuja kulkarni

Inspirational

3  

Rutuja kulkarni

Inspirational

मुलगी म्हणून

मुलगी म्हणून

1 min
379

मुलगी म्हणून तुला तुझा जन्म नकोसा वाटू लागणारे 

ते सारे बंधन तु झुगारून दे.

तुला समाजात वावरताना पावलोपावली

मुलगी म्हणून रोखू पाहणाऱ्या त्या प्रत्येक अडसरांना

तु तुझे सामर्थ्य दाखवून दे.

तु नुसतेच शिक्षण घेऊन,

तुझ्या हक्कांची माहिती ठेवू नकोस फक्त, 

वेळोवेळी त्या हक्कासाठी निर्भीडपणे लढायला शिक.

तुझ्या हसण्यावर, तुझ्या व्यक्त होण्यावर,

तुझ्या स्वतंत्रपणे वागण्यावर प्रश्नचिन्ह उभा करणार्‍यांना सार्‍यांना तु उत्तर दे. 

तुला मुलगी म्हणून पाशात अडकवू पाहणाऱ्या त्या बुरसटलेल्या विचारांवर,

तु तुझ्या नव्या विचारांचे पांघरूण घाल.

मुलगी म्हणून तु स्वतः, आधी तुझा विचार कर

तुझा आदर, तुझा स्वाभिमान जप.

मुलगी म्हणून जन्म म्हणजे कैद नाही,

मुलगी म्हणून जन्म हा आयुष्यभराचा सोहळा आहे,

हे तुला कळायला हवं.

मुलगी म्हणून तुझं जगणं तू मुक्तपणे स्वीकारायला हवं.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational