STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational Others

3  

Manisha Vispute

Inspirational Others

मुलगी काळाची गरज

मुलगी काळाची गरज

1 min
204

कन्या असे दुधावरची साय

होते कधी माझी माय,

चैतन्याचा अखंड झरा

तिच्याशिवाय घराला शोभा नाय...


काळजीत राही सदैव

मदतीसाठी तत्पर,

करुन अर्थाजन

सांभाळी आपले दप्तर...


तोंड देते धैर्याने

उभी रहाते पाठी,

हिंमत वाघावाणी

लढते भावासाठी...


आपुकीचा ती अतूट धागा

जोडी माहेर-सासराचे बंध,

शब्द सुमनांची करुन उधळण

पसरवी नात्यात सुगंध...


मुलगी काळाची गरज

वार्धक्याचा आधारवड,

वेलीवरची नाजूक कळी

अलवार तिची उलगड...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational