मुले...
मुले...
मुले देवा घरची फुले,
अविरत खळखळणारे झरे
अखंड ऊर्जा संचारलेले तुरे,
दमुन भागुन रात्रीला डोळ्यावर झुले...
मुले ओठी निखळ हास्य बहरे ,
चौथा ऋतु हा क्षणोक्षणी मोहरे,
सैराट धावणारे वारे ,
चांदण रात्रीचे लुकलुकणारे शुभ्र कांती तारे...
मुले स्वप्नाच्या दुनियेत भुले,
साऱ्या जगाला खेळण करे ,
स्वच्छंदी पाखरू आपल्याच आकाशात भिरभिरे ,
यांच्यामुळे जीवनात आनंदाला उधाण आले ...
मुले दूधावरच्या सायीने रवाळ स्निग्ध ओले,
श्वासात सुगंध भरून वाहणारे,
निरागसता यांची प्रेमाला ओलीचिंब करे ,
यांचे ईश्वरास आवडे साकडफुले ...
