मुले मोठी होत असताना..
मुले मोठी होत असताना..
होणं आई बाबा असते जबाबदारी,
मोठी होत असताना मुले घ्यावी खबरदारी..
बदल हा निसर्गाचा नियम असे....
मोठी होत असताना मुले,
त्याच्यात ही होत असतात बदल काहीसे..
शारिरीक तर मानसिक थोडे थोडे..
हिच असे वेळ त्याना समजण्याची...अन्
समजवण्याची अनुभवाचे धडे...
जेव्हा स्वभाव होतो रागीट आणि चिडचिडा,
तेव्हा आपणच आवरायचा आपला राग थोडा...
नाजुक असते मनाची स्थिती,
अलगद पणे हाताळायाची त्यांची मनस्थिति...
मोठी होत असताना मुले,
भासे जणु फ़ुलणारी फुले...
आपल्याला त्याना लागणार जपावे,
मनसोक्त उडणारी ती आहेत फुलपाखरे...
घेऊ दे त्यांना उंच भरारी, मोकळ्या आकाशी...
निर्णय घेऊ द्या स्वत:हून ... आपण राहू या पाठीशी..
मार्ग त्यांना चालू द्या ....मार्गदर्शक बनू त्यांच्या साठी....
घेऊनी डोळ्यात स्वप्ने नी ओठात हसू.....
मुले मोठी होताना पाहू...
मुले संसारात, करियर मध्ये रमली जरी.....
आई बाबांना खूप काही करायचे असते,
मुले मोठी झाली तरीही....
