STORYMIRROR

Trupti Naware

Abstract Fantasy

2  

Trupti Naware

Abstract Fantasy

मुलाखत

मुलाखत

1 min
355

पहीली ओळ दुसऱ्या ओळीशी भिडत होती

यमक जुळत नव्हते दाटलेल्या भावना बोलत होती

एक जखमी झालेली कवीता

शब्दबंबाळ होवून कण्हत होती ......

तिच्या अर्थाची धार हृदयाला पाझर फोडणारी

डोळ्यात सरीता बनुन वाहत होती ....

एका अल्लड छंदाने मुक्त छंदात वाहावले

शाही संपत होती..पानं भरत होती

कल्पनेच्या शिखरावर चढताना

एक एक कविता उन्मळुन पडत होती

चारोळीतली कथा कडव्या कडव्यात बोलत होती

आठ ओळीतली व्यथा गझल होवू पहात होती..

मुक्त छंदात मुक्तपणे

अल्लड छंदात वाहावून

मनाने मनाची मनसोक्त घेतलेली

एक मुलाखत ...कवीता होत होती.!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract