STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

मुकुंदा

मुकुंदा

1 min
28.8K


कोठे लपून आता बसलास रे मुकुंदा

का दानवा पुढे तू हरलास रे मुकुंदा--१


कित्येक द्रौपदींची अब्रू लयास जाता

पुरवून कापडे का दमलास रे मुकुंदा--२


सांगीतली जरी तू गीता धनंजयाला

दलदल कलीयुगाची फसलास रे मुकुंदा--३


आता न धर्म कोठे सांगावयास उरला

होणार काय तू जर नसलास रे मुकुंदा--४


करतोस गोकुळीं का अद्याप रासक्रीडा

गोपींमध्येच का तू रमलास रे मुकुंदा--५


आवाज बासरीचा कानावरी न येतो।

आम्हावरी कशाने रुसलास रे मुकुंदा--६


प्राण्यांसमान जगणे पाहून माणसाचे

उपहास दावण्या का हसलास रे मुकुंदा--७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational