मुक्त संचार
मुक्त संचार
चक्र आहे जगण्याचे
शिका ते वृक्षाकडून
जसे स्थिर स्थितप्रज्ञ
जगा निसर्गाकडून
घर सोडतं पिकलं
बघा अलगद पान
खोल रुतली मुळात
नाती बहरली छान
प्राणवायू देण्यासाठी
पान न पान जिवंत
समतोल निसर्गाचा
झाडे जगावी निवांत
घेती छाया वाटसरूं
घनदाट त्या वृक्षांची
पाखरांचा तो निवारा
ऊबदार घरट्यांची
जमिनीची थांबविण्या
धूप चढे गगनात
खेळ खेळे ते ढगांशी
पाणी मुरे पावसात
झाडे वाचवून झाडे
नाळ आपुली वाचवू
मुक्त संचार करण्या
श्वास झाडांचे जगवू
®©कवयित्री नालंदा वानखेडे
नागपूर
