मुग्ध प्रेम
मुग्ध प्रेम
तिचं त्याच्यावर प्रेम असतं
पण त्याला ते माहित नसतं
टाकलेल्या प्रेमळ कटाक्षांचं
गणित समजलेलं नसतं
तिच्या प्रेमळ कौतुकाचं
त्याला स्पेशल अप्रुप नसतं
फोनवरच्या लाडिकपणाचं
गुपित समजलेलं नसतं
तिच्या अंतर्यामीचं प्रेम
ओठांवरच अडंत असतं
तिच्या नजरेच्या भाषेचं
गूढ समजलेलं नसतं
दिवस महिने वर्षं
असेच निघून जातात
मुग्ध प्रीतीच्या कळ्या
उमलायच्या राहतात
एका रम्य सकाळी
ती प्रसन्न हसल्यावर
चांदणं सांडतं
तिच्या हसण्याचं गुपित
त्याला समजतं
नजरानजरीनंतर
काँफी प्यायचं ठरतं
एकाच बैठकीत लग्न ठरुन
महिन्यात शुभमंगल होतं
