STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

मतदान

मतदान

1 min
240

लोकशाहीचा घटक मी

हक्क माझा बजावणार

मतदानाच्या दिवशी मी

मतदान नक्की करणार.


      आश्वासने खोटी अन्  

      थापांना नाही भुलणार 

      घेऊनिया निर्णय योग्य

      मतदान नक्की करणार.


असो कुणीही बडी मंडळी

दबावाला ना बळी पडणार

विचार करून देशहिताचा

मतदान नक्की करणार.


      निवडणुकीचे रिंगण मोठे

      असतील किती उमेदवार

      खरी तळमळ असणाऱ्यास

      मतदान नक्की करणार.


चिन्हे पाहून मतदानयंत्राची

योग्य तेच बटण दाबणार

मतदार राजा आहे ना मी

मतदान नक्की करणार.


      पाहून व्हीव्हीपॅट वरती

      मतदानाची खात्री करणार

      मतदार राजा आहे ना मी

      मतदान नक्की करणार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational