मृगजळ
मृगजळ
पैसा एक मृगजळ
भुलवते भल्यांनाही
धावे मनू तयापाठी
हाती येत नाही काही (१)
पैसा पैसा करुनिया
तरुणाईमधे पळे
गमवूनी आनंदाला
सुख कशात नकळे (२)
वेळ नसे कुटुंबाला
परिश्रम अहोरात्र
काटा सरके काळाचा
दूर नाती गोती मित्र (३)
संधीकाल ये जवळी
तेव्हा उमजले सारे
पैशामागे धावुनिया
गमावले सुख खरे (४)
गेली वेळ निघूनीया
अश्रू येती पस्ताव्याचे
मृगजळ हे फसवे
आता मार्ग न सापडे (५)
नका धावू पैशामागे
मोहमयी मृगजळ
एकाकीच संध्याकाळी
नसे कुणीही जवळ (६)
