STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Inspirational

3  

Namita Dhiraj Tandel

Inspirational

मृद्गंध पावसाचा

मृद्गंध पावसाचा

1 min
210

सूर्यदेव प्रारंभ करती

पर्जन्य नक्षत्रा सामोरी..

वर्षा ऋतुच्या आगमनी

तप्त धरती विसावती..


हरितमय सृष्टी पिसारे

अलवार फुलवी..

टपटप सरी शिडकावी

पुलकित मृदगंध तनीमनी..


धरतीच्या भेटीस आतुर

मेघराज लपंडाव खेळती..

नक्षत्रा संगे अनोखा

वर्षा सरींचा खेळ प्रारंभीती..


रिमझिम पर्जन्य मृगाचा

थुईथुई नाचती अंगणी..

आर्द्राची रिमझिम पडझड

वसुंधरेस चिंब भिजवीती..


झिम्माड पर्जन्य पुनर्वसूचा

कृष्ण ढगांची मुसळधार गती..

पुष्याची संथ धार

अलगदच येऊन बरसती..


लहरी पर्जन्य आश्लेषाचा

झिमझिम वेगात भर धावती..

मघाची मेघ गर्जना

कडाडत डरकाळी फोडती..


शांत सरींचा पर्जन्य पूर्वा फाल्गुनीचा

ऊन पाऊस खेळात इंद्रधनु प्रगटती..

उत्तरा फाल्गुनीची योग्य वेळ 

बळीराजाला लागवडीस उपयुक्त ठरती..


तांडव पर्जन्य हस्ताचा

थैमानी तुफान कोसळती..

चित्राची शेवट परतीच्या

प्रवासाचे चिन्ह दर्शवती..


नक्षत्रांचे देणे देती पर्जन्य स्वातीचा

शिंपल्यांच्या गर्भात मोती जन्मती..

वर्षा ऋतूची नवसंजीवनी

बहरे जीवसृष्टी सृजनोस्तवी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational