Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

मराठीची दैना

मराठीची दैना

1 min
237


मराठी घरात असतो दररोज

इंग्रजीचा सतत संचार

पाश्चात्य संस्कृतीने घालतात

मराठी शब्दांचा आचार


मायबोली मराठी आमची

मातृभाषा आहे अतिगोड

इंग्रजी शब्दांचा वापर होतो

मध्ये मध्ये बिनधास्त, सडेतोड


लाज वाटते आज अनेकांना

मराठी व मराठी शाळेची

भरमसाठ डोनेशन देऊन घाई

मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याची


सकाळी उठल्या उठल्या म्हणते

बायको ओ माय डिअर

जणू तिच्या अंगात संचारतो

इंग्रजीतला शेक्सपिअर


पडत चालला विसर मराठीचा

आज मराठी माणसाला

परकिय भाषेचे अतिक्रमण

कारण ठरते ऱ्हासाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational