मराठीच आमुची (कविता)
मराठीच आमुची (कविता)
मराठीच आमुचा बाणा । मराठमोळा कणा।।
मराठीच आमुचा गाव । मना मनाचा ठाव।।
मराठीच आमुचा आरसा।अथांग ज्ञानाचा वारसा ।।
मराठीच आमुचा धडा।अंगणातील प्राजक्ताचा सडा।।
मराठीचआमुची भक्ती। अंतरीची शक्ती।।
मराठीचआमुची माता। तुकोबांची गाथा।।
मराठीचआमुची ज्ञानेश्वरी। भाषेची देणगी ईश्वरी।।
मराठीचआमुची भूपाळी।सौभाग्य गोंदण कपाळी।।
मराठीचआमुची माऊली। प्रतिभेची साली।।
मराठीचआमुची नाती।देवघरातील समईच्या वाती ।।
मराठीचआमुची शान। महाराष्ट्राचे गुणगान।।
मराठीचआमुची शोभा। सकाळ प्रहरची सुंदर प्रभा।।
मराठीचआमुची बोली। शब्दांच्या अर्थांची खोली।। मराठीचआमुचे धैर्य। पराक्रमाचे शौर्य।।
मराठीचआमुचे गाणे। बावन्नकशी खणखणीत नाणे।।
