STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

5.0  

Pandit Warade

Inspirational

मराठी आमुची छान

मराठी आमुची छान

1 min
669


*मराठी आमुची छान*


किती हो सांगू, किती मी गाऊ, मराठीचे गुणगान।।

विश्वामध्ये महान, आमुची मराठी भाषा छान ।।धृ।।


उद्गाराने नवल मांडतो। विसर्ग थोडा जोर लावतो।।

काना, मात्रा, उकार देती शब्दांना सन्मान।।१।।


अनुस्वाराचे कुंकू भाळी। प्रश्नचिन्ह जणू उलटी बाळी।।

वेलांटीचा पदर डोईवर नवरी जणू रूपवान।।२।।


थांब जरासा स्वल्पविरामा। पूर्णविराम अंतिम थांबा ।।

आपुले म्हणणे पुढे मांडण्या अवतरणाचा मान।।३।।


मुले खोडकर करती वळवळ। खट्याळ चळवळ, आणि पळापळ।।

'ळ' या अक्षरा मराठी सोडून नसे कुठेही स्थान।।४।।


ज्ञान मिळवण्या वाचू मराठी। जिथेही भेटू, बोलू मराठी ।।

मिळवून देऊ तिला जगामध्ये उच्चकोटीचे स्थान ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational