मोर
मोर
डोक्यावर तुरा हा सुंदरसा
फुलवितो पिसारा हा रंगीतसा
लहान थोरांना सुखावणारा
हळुवार पिसांचा स्पर्श हा न्यारा
राष्ट्रीय पक्षी मोर तू
सर्व पक्षांमध्ये भासतो थोर तू
वाटते थुईथुई नाचताना
मनमोहक पिसारा फुलवितांना
तुझ्याकडे डोळे भरून बघावे
क्षणभर सुखातही मनभर आनंद
कसा घेता येईल..? हे तुझ्याकडून रे शिकावे
