मोकळे आकाश
मोकळे आकाश


नाही हाती फक्त
पाळण्याची दोरी
देशाची संसद
तुझ्याकडे पाही.....१
घर दार सारे
तुझ्याच पदरी
उरकती कामे
तुझ्या दशहाती.....२
ऑफिस तुझेच
तूच सांभाळशी
अस्तीत्व तुझेच
तूच दाखविशी.....३
खेळ नियतीचा
विधवा अकाली
खंबीर निर्धारा
कल्पवृक्ष जशी....४
<
span>माय बाप सारे
सोडून माहेरी
जोडी नवे नाते
येवून सासरी.......५
भ्रुण हत्या आज
पाप तुझ्या माथी
घराचा दबाव
दिवा वंशासाठी.....६
जगातील कला
तुझ्याच पायाशी
ओळख कशाला
तुच सर्वव्यापी.....७
क्षेत्र आज सारे
आहे तुझ्या मुठी
मोकळे आकाश
फक्त तुझ्या साठी....८