मोदक
मोदक
लहानपणीचा आठवला दिवस गणेश चतुर्थीचा
बनवला होता मी बाप्पासाठी नैवेद्य मोदकाचा
आई आणि आजी गुंतल्या होत्या करण्यास मोदक
मी पण त्याच्या टोळीत घुसले पटकन
नक्षीदार सुबक पांढरे शुभ्र मोदक शोभत होते ताटात
मला मात्र तसे करायला नव्हते जमत
मग मी कसा बसा लाडू तयार केला
त्याची शेंडी ओढून मोदक तयार केला
नव्हता नक्षीदार पण दिसत होता मोदक
आईने मग सगळ्या मोदकांबरोबर त्यालाही उकडले
बाप्पाच्या पानावर त्याला ठेवले
बाप्पाला नेवेद्य दाखवून आशीर्वाद मिळवला
आणि तो शेंडीवाला मोदक मी मटकावला