STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

मनोगत...!

मनोगत...!

1 min
629


मुक्त राहुनी जगतो आम्ही

हा आमचा अभिमान

संविधानास देतो आम्ही

सर्वोच्च इथे सन्मान


अनेक जाती अन अनेक धर्म

इथे सुखाचे राहणीमान

एकजीव होउनी जीवन जगती

हा जगी बहुमान


स्नेह सहिष्णुता अंगी बाणवून

आनंदी करतो गुजराण

एक मेकास समजूनी

वसवितो हृदयी एकीची जाण


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

देतो राखून सर्वांचा मान

हीच आपल्या देशाच्या

प्रजासत्ताक दिनाची आगळी शान....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational