STORYMIRROR

Monali Kirane

Drama

2  

Monali Kirane

Drama

मनोद्वंद्व

मनोद्वंद्व

1 min
51

दोन भावविश्वांचं द्वंद्व

चालू माझ्या मनात,

एक शांत सुख-सावलीत,

दुसरं तळमळतं उन्हात!


एक मानतं संतोष

जे जे पडेल पानात,

दुसरं राहातं हुरहुरत

अपेक्षांच्या रानात!


एक म्हणतं काय करणार

निर्बल-एकटं जगात,

पेटून उठतं दुसरं

मन अन्यायाच्या रागात!


झगडून रक्तबंबाळ होतं

आपल्याच ह्या विचारांत,

पांघरूण घालून झोपवतं

मग शांत मन विवेकात!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama