मनमोहिनी
मनमोहिनी
मनमोहिनी
कोमल कांती सुकुमार नार
अदा पाहता भुललो पार
रंभे परी रूप गोजिरे
करी रुपमती रुपशृंगार
नयन शराबी कोमल कांती
पाहून सखे भंगली शांती
रात्रंदिन मनी तुझा विचार
कसे कळेना कधी जडली प्रीती
जलराणी की जलपरी तू
मोहित झालो स्वप्नपरी तू
धवल वस्त्र तू लेवून राणी
बेहोष करशी मला तरी तू
शंख नाद करून गगन भेदूनी
मना मनाची तार छेडुनी
सप्तसुर हे मनी झंकारूनी
प्रेम वलय मज घाली मोहिनी
मयुरपंखी रूप मोहिनी
प्रिया असावी अशी साजणी
साथ जर असता मला तर
भाग्यशाली मी असे जीवनी
