मंजुघोषा
मंजुघोषा
मी न कोणी अप्सरा वा उर्वशीही
एक मी ही चार चौघींसारखीही
काल काही स्वप्न पाही आवडीही
कोणतेही पूर्ण नाही बावरीही
शुभ्र वस्त्रे लेउनीया चाललीही
का मला सोडून दूरी थांबलीही
का अशी वाटेत भेटे सुंदरीही
हा नको आभास चित्ती अंतरीही
का अशी वेडात बोलू लागलीही
व्यर्थ बोला का उगाची घालवीही
असत्याच्या भारे अशी भारलीही
साहणे ना शक्य तेव्हा वाकलीही
