मनिषा
मनिषा
असेल जो वर चंद्र सूर्य हो
स्वातंत्र्य नांदेल सदैव सदा हो..
देशप्रेमाची ओथंबलेली,
मनामनातून सर्वत्र लाट दिसें..
नाही कुणी हो सत्ताधारी,
नसेल कुणी असे विरोधी..
समाजाच्या उन्नत्ती साठी
ध्यास फक्त मनी असे..
नसेल महत्व कुणी पदाला,
सर्व जपतसे लोकहिताला..
जिंकणारा उमेदवारही,
हरणाऱ्याचा जिवलग मित्र बने ..
प्रत्येक कामास मिळे प्रतिष्ठा,
सरली जावो सारी विषमता..
सर्वाना सुखदायी दिन येवो,
जे वांछील ते सर्व काही मिळे..
बलसागर आपला होई देश हो,
बुद्धिमानांची यात खाण हो..
कोण कशाला जाई परदेशीं,
सुंदर स्वर्ग जेव्हा इथे असे ..
संस्कृतीचा आम्हा वारसा,
जपा अनमोल संतपरंपरा..
दिपस्तंभ असेल राष्ट्र आमुचे ,
अनुकरण्या या सर्व जगता ..
आदर्श मानवतेची मुल्ये..
या देशाची सदा जपा हो,
नेतृत्व जगाचे करेल भारत
तो दिन आता दूर नसे हो ..
राहा सर्व गुण्या गोविंदे,
सोडा सर्व भांडण तंटे..
हद्दपार जात करा हो,
फक्त सर्व भारतीय असे..
