STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

मनी...!

मनी...!

1 min
3.5K


आमची मनी आमची मनी

फार फार गुणी

ती येणार हे

स्वप्नी देखील नव्हतं

कारण असलं काही

घरात चालणार नव्हतं


एक दिवस

शाळेत मला ती दिसली

पोरं तिच्या मागे लागली

ती घाबरली

इकडे तिकडे पळू लागली

माझ्या पायाशी येऊन बसली

काखेत मारली आणि घरी आणली


ही काय ब्याद पासून ते पीडा पर्यंत

सारे सोपस्कार झाले आणि

तिचे जीवन आमच्या घरी स्थिरावले


हा हा मनात मोठी झाली

पायात पायात म्याव म्याव

करून शिव्या खाऊ लागली

आमची भाषा पण समजू लागली


तिच्यामुळे साप किड्यांचे भय

कोसो दूर पळून गेले तसे तिचे

अप्रूप वाटू लागले

थोडक्यात ती घरचा सदस्य झाली

गळ्यातला सगळ्यांच्या ताईत झाली


पण एकदा डोळे मिटून

गुर्र गुर्र आवाज काढू लागली

आणि माझे लक्ष तिच्या

निरागस चेहऱ्याकडे गेले


बरे वाटले बाळसेदार रुपडे पाहून

पण लक्षात आले गुर्र गुर्रणारी

मनी नसून ती मुन्या आहे

ती च रूपांतर तो त झालेलं पाहून

मला जरा नवल वाटलं


म्हंटल नाहीतरी नारी शक्ती सक्षम असते

मुन्या च मन्या होणं स्वाभाविक आहे

आपल्या देशात कधी, कोठे ,

काय ,कसे ,केंव्हा होईल

हे काही सांगता येत नाही


पावसाचे अंदाज चुकतात

तिथे नशिबाचे अंदाज चुकले

म्हणून काही त्याचे अप्रूप ही वाटत नाही

आज मन्या मजेत आहे

गुर्र गुर्र करीत

नित्य सुखाची झोप लेकाचा घेत आहे....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama