STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मनी दाटे हुरहूर

मनी दाटे हुरहूर

1 min
177

धनी माझा रणांगणी

कसा अवचित गेला

सुट्टीवर असूनही

कसे बोलाविले त्याला?


ढग दाटले युद्धाचे

सीमावर्ती भागामधे

सज्ज आपुले सैनिक

सारे आता वर्दीमधे


जीवा नसेल विसावा

धुरा रक्षणाची घेती

रात्रंदिन सीमेवरी

तोफा डागून ठेवती


युद्ध चाले घनघोर

सखा गेला दूरदूर

कधी परतेल घरी

मनी दाटे हुरहूर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract