मंगळागौरी
मंगळागौरी
श्रावण आला, येत मंगळागौरी ।
हिंदोळ्याभोवती जमलेल्या पोरी ।।
रुसून बसलेली यादवराणी ।
सखीसंघात गाते श्रावणगाणी ।।
भरजरी कशी ल्याली नऊवारी ।
माणिकांची नाकी नथ कारवारी ।
अंगठी, कंठी कंठा चपलाहार ।
लाजऱ्या कळीला साजरा शृंगार ।
जन्मभर तिला सासरचा वसा ।
पतीदेव तिचा महादेव जसा ।।
माहेरवाशीण जागरी रंगली ।
उखाण्यात बाई उगाच लाजली ।।
नको तिला कधीही वाडा चौकाचा ।
त्याच्यासह फक्त ध्यास कुंकवाचा ।।
इवल्याश्या तिच्या अनंत विश्वात ।
इवलीशी प्रेमकथा श्रावणात ।।