STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मंद...मंद

मंद...मंद

1 min
797

मंद्र स्वर कानी येता

पहाटेच सुखावले

उषःकाली नादमयी

स्वरनाद झंकारले


मंद वा-याची झुळुक

गेली सुखावून मला

गात्रे पुलकित झाली

रविराज उगवला


मंद सळसळ कानी

पर्णराजी बहरात

दुपारच्या प्रहराला

ओघ दाटला मनात


संध्याकाळी सूर्य कले

प्रभा रत्नाकरा वरी

मंद मंदशा तेजाने

सुख मन्मनी अंतरी


निशा धरेवरी येता

येई साम्राज्य तमाचे

अवखळ बाळलीला

सुखविती उभयांते


नभी धवल चंद्रमा

मंद तेज तारकांचे

लूट प्रणयलीलांची

प्रिय यामिनी तयांते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract