मनातल्या मनात
मनातल्या मनात
मनातल्या मनात सखी
झुरत किती तू राहशील
सुखाची आस उरामध्ये
कितीसे दुःख झेलशील ।।०१।।
रूप ईश्वराचे या जगी
तुझ्यात सारे पाहतात
माया ममता वात्सल्य
या काळजात राहतात ।।०२।।
कधी व्यथा मनातल्या
दिसतात ना मुखावरी
वाटतेस सुख जगाला
दुःख भोगतेस अंतरी ।।०३।।
पुत्र कुपुत्र झाला तरी
अपराध पोटी घालते
रडे मनातल्या मनात
लटकेच मुखी हासते ।।०४।।
सदैव काळजामधून
प्रेम झरा नित्य झरतो
मनातल्या मनात दुःख
सौख्य झरा ओसरतो ।।५।।
