STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

मनातली कविता

मनातली कविता

1 min
27.5K


कधी कधी मनामध्येच घुसमटते कविता

मनातून कधीतरी उसळू पाहते कविता ।।


साथ ही बहूतांची जीवन पथावर लाभता 

कृतज्ञता भाव घेऊन जन्म घेते कविता ।।


संगतीत प्रेयसीच्या प्रीत फूल उमलते

गंधाळलेल्या मनामधून अंकुरते कविता ।।


उन्हात जीव तोडूनि माय बाप कष्टता

कळवळते हळहळते मनातली कविता ।।


विवाहितेचा कुण्या छळ जेव्हा पाहते 

क्रोध मनात दाटतो, थरथरते कविता ।।


राज रोस चालला संस्कृतीचा नाश हा 

मनातल्या मनात ती आक्रंदते कविता ।।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational