मनाची श्रीमंती
मनाची श्रीमंती


अठराविश्वे दारिद्र्य
घरात भरलेले
हातातोंडाची गाठ
कठीणच असलेले (1)
एक किरण सुखाचा
चिखलातील कमळ
किरणच्या हुशारीने
सोसायला मिळे बळ (2)
पोटाला चिमटा घेऊन
मुलाला मोठे केले
त्याने डॉक्टर होऊन
दोघांचे पांग फेडले (3)
गरीबी सरुन आता
सुखाचे दिवस आले
दोघांच्याही डोळ्यांत
आनंदाश्रु दाटले (4)
आवर्जून मुलगा सांगे
आई-वडीलांची महती
गरीबीतून लाभली
मनाचीही श्रीमंती (5)