मनाची चौकट ...
मनाची चौकट ...
ओलांडून जावी पुढे ,
जी सीमा मी आखली ,
जपून ठेवली प्रीत ,
रीत म्हणून राखली ...
तरी समजेना मनाला ,
प्रयत्न कधीची चालली ,
मनाची चौकट मनानेच ,
टिचकवून टाकली ...
आभाळ हृदयात ,
मनाची व्याख्या कळली ,
कोण बांधेल चौकट ,
ज्याची सिमा ना ठरली ...
प्रेमासवे वादळे ,
युगानोयुंगे ठरली ,
कृष्णाखातर राधाही,
उंबरठा ओलांडली ...

