STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

मनाची भाषा

मनाची भाषा

1 min
11.5K

कोणास ठाऊक पण का?

मनाची भाषा कोणालाही कळत नाही 

समोर असतानाही मनातले भाव वळत नाही 


ओरडून सांगितलं कीच कळते का सारे 

न बोलता समजले तर त्याहून काय न्यारे


मनात साचलेले कधी पाहिले का उलगडून 

लपलेला खजिना पाहून तुम्ही जाल गडबडून


मनाचा प्रत्येक कोपरा काही तरी खुणावतो

अनंत कथानकं चुटकीसरशी तुम्हाला सुनावतो


समजून घ्यायचा थोडा प्रयत्न तुम्ही करा

सापडेल दडलेला शिल्पकार तुम्हाला खरा


मनाची भाषा तशी नसते काहीच अवघड

समजून घ्यायला तुम्ही काढा थोडी सवड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational