STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Abstract

4  

Ramkrishna Nagargoje

Abstract

मन

मन

1 min
375

मन लबाड लबाड,

आवर त्याला थोडं थोडं

आता होतं बरं बरं 

पण पळू लागलं पुढं पुढं


वारं म्हणालं मनाला,

मना नको जाऊ पुढं पुढं,

कुठंही गेलं तरी,

पळसाला, तीन पानं


मन लबाड लबाड,

खरं बोलणं, त्याच्या,

येतं जीवावर,

खरं लागलं कसाला,

की हे सोनं सोनं म्हणतं

असं बाई मन बावरं


मन लबाड लबाड,

दहा दिशा फेरा मारतं

थकलं भागलं मन,

पुन्हा पुन्हा शांती मागतं


आवर गं बाई मन सारं,

नाहीतर म्हणशील,

आता इथं होतं,

कुठं गेलं


मना मना जाग जरा,

नको होऊ वेडा पिसा,

संयम धर थोडा थोडा,

विवेक देईल सुख तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract