Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Nimbalkar

Inspirational

3  

Pandit Nimbalkar

Inspirational

ममतेचा झरा

ममतेचा झरा

1 min
262

सोडा तुम्ही मनातली कटुता 

एकमेकांविषयी ठेवा कळवळा 

शंका कुशंका राग रोष सोडा 

जपू काळजात थोडा जिव्हाळा ||१||

पैका पैका सारा मागेच राहतो 

धनाचा हव्यास माणुसकी मारतो 

आले किती गेले किती रंक नि राव 

चांगला तोच आठवणीत उरतो ||२||

सुधारलो म्हणता म्हणता बिघडलो 

निसर्गाचे नियम स्वार्थाने मोडू लागलो 

त्याने जरा गती बदलली तरी 

आपण क्षणात कोलमडून पडलो ||३||

एक व्हा, नेक व्हा, जगा समाधानी 

मानवता जपू, टाळू निसर्गाची हानी

जीव जीवास जाणू, राहू आनंदानी 

आयुष्याची रचू नव्याने कहाणी ||४||

नाते शब्दांचे टिकवू जन्मोजन्मी 

मैत्रीच्या नात्याचा अभिमान धरा 

गुंफलेल्या प्रत्येक नात्याविषयी 

वाहू द्या हृदयात ममतेचा झरा ||५||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational