मम सखी
मम सखी
छमछम पैंजण वाजवत आलीस
केसात गजरे माळत आलीस
आकांक्षांचे घर बांधायला आलीस
प्रसन्न मनात रहायला आलीस
हसरे स्मित गालात घेऊन आलीस
लाजरी प्रीत डोळ्यांत ठेवून आलीस
मुग्ध प्रीती ओळांवर लेऊन आलीस
मनात विराजमान होऊन राहिलीस
कधीकधी फार झुलवलेस
कधीकधी रुसवेही खुलवलेस
तू रुसल्यावर शब्दांवर खेळवलेस
तुझी आराधना करायला लावलेस
कुठूनशी अचानक येतेस
लिहायला अधीर करतेस
प्रिय सखी माझी आहेस
सदासर्वदा प्रसन्न रहावेस
