मला शाळेला जाऊ दे!
मला शाळेला जाऊ दे!
अरे देव बाप्पा
कोरोना लवकर जाऊ दे
पुन्हा मला एकदा
माझ्या शाळेला जाऊ दे
नको आता ऑनलाईन
मला ऑफलाईनच शिकू दे
थोडीशी मस्ती पुन्हा
मित्रांसंगे करू दे
माझी शाळासुद्धा
वाट माझी पहाते
तिथल्या प्रत्येक भिंतीला
आठवण माझीही येते
आठवणीचं हे चक्र
आता लवकर लवकर थांबू दे
पुन्हा एकदा मला
माझ्या शाळेला जाऊ दे!!
