मला पहा नि फुलं वहा
मला पहा नि फुलं वहा
ऐका कहानी राज कुमाराची
सौंदर्य तयाचे भासे मदनाचे
कांती तेजस्वी ,नयनात काजळ
शृंगारा तया लाजे ति नार देखणी
मग्न राजकुमार रूपात स्वत:च्या
वा-या वर राज्य सोडले तयाने
ना भान प्रजेचे ना जाण कर्तव्याची
तुझ्या सौंदर्याला जोड दे कतृत्वा ची
विराचा शृगांर खरा शौर्याचा
व्यर्थ आहे हा अभिमान तो रूपाचा