मला मिळेना
मला मिळेना
चाललो असाच मी, चालू काय कळेना
धावतोय कश्यासाठी, काहीच ते मला कळेना
उद्याची भीती अशी, घास काय गिळेना
माज सारा मोडला, काम काही मिळेना
नशीब एवढे चिंधी, एकटे काही जळेना
धावतोय कश्यासाठी, काहीच ते मला कळेना
धावतोय एकटाच, कोणीच का पळेना
पडलो कैक वेळा, मदतीस हात काही मिळेना
सारी पाहतील पकडू मला, पण मी हाता कोणाच्या लागेना
धावतोय कश्यासाठी, काहीच ते मला कळेना
कितीही गोड बोला, कोणाशीच काही गळेना
पाटाचे पाणी ते आहो, पण पाटालाच वळेना
वेळ कोणावर येईल, काहीही करा टळेना
धावतोय कश्यासाठी, काहीच ते मला कळेना
नशीब काय सांगू तुला, आता तरी दुःख तू रेळना
जरा तरी खुश होऊन, आता तू तरी खेळना
काहीही असो विधात्या, हालव तो आयुष्याचा पाळणा
धावतोय कश्यासाठी, काहीच ते मला कळेना
