मित्रा
मित्रा
नाते मैत्रीचे जपण्यास नाही मी भित्रा
तू फक्त आठवूनी मला तर बघ मित्रा
भेटलास मज तू कधी कुठे कसाही
नाते अनमोल हे देऊन गेलास मित्रा
नको भार आभार मला तुझ्या मनाचे
हक्काने मज हाक देऊन तर बघ मित्रा
नको बाता चंद्र ताऱ्यांच्या या नात्याला
खुल्या आभाळात झेप घेऊ चल मित्रा
त्या संकटातही असेल मी सोबतीला
तू फक्त हात तर देऊन बघ मित्रा
