मित्र...
मित्र...
लागली आग घराला
बेचिराख झाले घर सारे..
ओळखीचे शेजारी पाजारी
सांत्वनाचे चार शब्द ठेवून गेले..
मित्र आला धावून विचारले त्याने
"सांग मित्रा जळाले काय काय रे तुझे ?
मी म्हणालो,मीच वाचलो बाकी जळूनी सारे राख झाले
वाचले तरी काय आहे ?
ओल्या डोळ्यांनी मिठी मारुन मित्र म्हणाला, "अरे मग जळाले तरी काय आहे"?
