मिशन फेल
मिशन फेल
तू होतीस प्रेमळ , अबोल
माझ्या ठायी- ठायी मी पण
तू होतीस सदैव तत्पर
मी होतो थोडासा गाफील
तू थोडीसी हळवी - हळवी
मी मात्र नाहक अभिमानी
का नाही घसरणार मग ?
रुळावरून प्रेमाची गाडी
तुला वाटलं मी बोलावं ...
मी का म्हणून आधी प्रपोज करावं
होणार काय .व्हायचं तेच झालं ...
आपलं मिशन फेल झालं
तुझ्यालेखी तू बरोबर ,मलाही वाटत मीच बरोबर
कोण जिंकलं , कोण हरलं ? एवढं मात्र नक्की
वेळ गेल्यावर कळून आलं , दोघेही चुकलोच
आयुष्याचं मातेरं मात्र दोघांच्याही झालं...

