STORYMIRROR

Varsha Gaikwad

Inspirational Others

3  

Varsha Gaikwad

Inspirational Others

मीच मला भेटावी

मीच मला भेटावी

1 min
274

माझी प्रतिमा कळून यावी 

भेट अशी ती घडून यावी

मुकुरासमोर बोलत असता 

भावभावना जुळून यावी 

गुणदोषांचा विचार व्हावा 

मनापासुनी सुधार व्हावा  

गर्व धारणा दूर लोटुनी 

आनंदाचा प्रसार व्हावा 


आयुष्याचे सोने व्हावे 

एक अनामिक जगणे व्हावे

भेट मनाशी मनास होता 

मनासारखे मरणे व्हावे 


ओंजळ भरुनी सुख उधळावे 

दिनदुबळ्यांचे दु:ख कळावे 

निस्वार्थी मी सेवा करुनी  

कामकार्यही लाख फळावे 

 

अनंतगंगा मला मिळावी 

माझ्यामधली कला खुलावी 

राग लोभ तो नकोच कसला 

सद्गुणांनी फळा फुलावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational