STORYMIRROR

Varsha Gaikwad

Romance Tragedy

2  

Varsha Gaikwad

Romance Tragedy

आला भरून पाऊस

आला भरून पाऊस

1 min
89

शब्द बोलके बोलके 

झाले अर्थहीन आता 

आयुष्याच्या गणिताचा 

किती गिरवावा कित्ता


ऊर दाटुनिया आला 

दु:ख झेलून झेलून 

तुझी आठवण रोज 

पितो ओंजळी भरून 


नको तिचं पायवाट 

पुन्हा नकोच गाऱ्हाणे 

एका एका क्षणासाठी 

किती झुरत रहाणे 


येतो भरून पाऊस 

कधी कधी काळजात 

उभ्या देहात पेटतो 

होऊनिया झंजावात 


कधी ऊन सावलीचा 

वाजवितो रोज पावा 

दिठीमध्ये लपवितो 

अंतरातील ओलावा 


आला भरून पाऊस 

स्मृती आल्या झराझर

थेंब ओलेती क्षणांचा 

ओघळला गालावर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance