तिच्यासाठी
तिच्यासाठी
1 min
183
तिच्यासाठी काहीतरी करेन म्हणतेय
माझं दुःख बाजूला मी सारेन म्हणतेय
होऊ दे ना तिचं थोड दुःख हलकं
तिच्यासाठी थोडंसं मी जगेन म्हणतेय
चांदण्यातच तिला कोणी बदनाम केलं
रात्री बेरात्रीच आता फिरेन म्हणतेय
ॲसिड हल्ला, तीक्ष्ण वार कुठे शरीर जळतंय
अन्यायाविरोधी आवाज थोडा उठवीन म्हणतेय
वासनेच्या नजरा इथे लोचट आहेत
गर्दीतल्या "त्याची" नजर शोधीन म्हणतेय
वेदना त्या डोळ्यातल्या वाहत होत्या अपार
शब्दा शब्दात भरून त्या मी लिहीन म्हणतेय
चेहऱ्यावरील मुद्रा तिच्या काही सांगत आहेत
तिलाच पुस्तक समजून मी वाचेन म्हणतेय
