अभंग-तू माझा विठुराया
अभंग-तू माझा विठुराया
1 min
97
सावळा हा रंग, सावळाचं संग|
तू माझा श्रीरंग, विठुराया||
अभंगात मग्न, डोळे मिटूनिया|
रुप पहातेया, तुझे देवा||
मनी आस आहे, तुला भेटण्याची|
वाट ही मनाची, चालतेया||
किती दिस गेले, तुला आळवुनी|
सुख दु:ख मनी, सांगोनिया||
चरणी तुझ्याचं, जीव माझा वाहे|
तू का अंत पाहे, देवराया||
मुक्ती आहे देवा, तुझ्याच भेटीत|
तुझ्याच मिठीत, अंत माझा||