STORYMIRROR

Varsha Gaikwad

Romance

2  

Varsha Gaikwad

Romance

जोगिया

जोगिया

1 min
101

बघ रंग खेळतो कान्हा, भिजते चिंब 

थरथरती काया रंगित ओले बिंब 

गंधित गात्रातुन मिळत राहते ग्वाही 

प्रतिबिंब लाजरे चोरुन कान्हा पाही 


तो स्वप्न पहाटे देत हासतो रावा

मन हाक शोधता हळूच वाजे पावा 

व्याकूळ सदा मम नयनांच्याच कपारी 

अलवार ओघळे अश्रू भल्या दुपारी 


तो श्याम सावळा आहे की घननिळा

जो हृदय चोरुनी करतो अल्लड चाळा 

तो संत असे की नादखुळा वैरागी

जो चित्तचोर भलताच असे अनुरागी 


मी तया आठवत नाही सांज सकाळी

या मनी नादते अखंड कृष्णभुपाळी 

या हृदय मंदिरी वास तयाचा आहे  

रंध्रातुन केवळ तोच जोगिया वाहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance